ध्वनी प्रदूषणाची समस्या
डीजे-ढोलपासून जोरदार आवाजामुळे लहान मुलांना स्थायी बहिरेपणा, डोकेदुखी आणि एकाग्रता कमी होऊ शकते. म्हणून संरक्षण आवश्यक आहे.

कानांचे संरक्षण साधने वापरा
लहान मुलांसाठी इअर प्लग्स किंवा इअर मफ्स, कॉटन बॉल्स वापरा. हे आवाज २०-३० डीबीने कमी करतात. 

 घरगुती उत्सवाला प्राधान्य द्या
   सोसायट्या शांत गणेशोत्सव साजरा करतात. घरात किंवा सोसायटीत छोटे कार्यक्रम त्याठिकाणी मुलांना घेऊन जा, हे मुलांना सुरक्षित ठेवते 

 मुलांना ध्वनीच्या धोक्याबद्दल शिकवा
 लहान मुलाना जोरात आवाज ओळखण्याची सवय लावा, डोकेदुखी किंवा कानात गुंज येत असल्यास कळवण्यास सांगा 

 डॉक्टरांचा सल्ला घ्या
उत्सवापूर्वी कानांच्या डॉक्टरकडे (ENT स्पेशालिस्ट) तपासणी करा, विशेषतः ज्या मुलांना आधी कानाचे त्रास असतील.

 ध्वनी स्तर मोजण्यासाठी ॲप्स वापरा
मोबाईल ॲप्स जसे 'Sound Meter' किंवा 'Decibel X' वापरून आवाजाचे स्तर तपासा. ८५ डीबीपेक्षा जास्त असल्यास मुलांना दूर करा. 

शांत उत्सवाला प्रोत्साहन द्या
 पर्यावरणवादी आणि सोसायट्या 'शांत गणेशोत्सव' ची मागणी करतात. त्याप्रमाणे मंडळांना नियमांचे पालन करण्यास सांगा. 

 स्थायी नुकसान करू शकतो
 लहान मुलांचे कान अधिक संवेदनशील असतात, आणि ८५ डीबीपेक्षा जास्त आवाज (डीजे/ढोलचा सामान्य स्तर) आरोग्याचे नुकसान करू शकतो.

सुरक्षित सण साजरा करा
गणेशोत्सव आनंदाने साजरा करा, पण मुलांच्या आरोग्याला प्राधान्य द्या. या टिप्स फॉलो करून ध्वनी प्रदूषणापासून वाचवा

Click Here