हिवाळ्यात मुलांना स्ट्राँग ठेवण्यासाठी द्या 'हे' पदार्थ
हिवाळा सुरु झाला की लहान मुलांच्या आरोग्यविषयक तक्रारी डोकं वर काढू लागतात.
सर्दी, खोकला, ताप असे लहान-मोठे आजार मुलांना सुरु होतात. म्हणूनच, हिवाळ्यात मुलांची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी त्यांच्या आहारात काही महत्त्वाचा बदल करणं गरजेचं आहे.
हिवाळ्यात फारशी तहान लागत नाही. त्यामुळे आपण कमी पाणी पितो. परंतु, यामुळे शरीर डिहायड्रेट होतं. म्हणून, मुलांना सतत पाणी पाजत रहा.
व्हिटामिन डी च्या कमतरतेमुळेही मुलं सारखी आजारी पडतात. त्यामुळे त्यांच्या आहारात पालक, दही, पनीर, गाजर यांचा समावेश करा.
मुलांच्या सकस आहाराकडे लक्ष द्या. त्यांना जंकफूडपासून लांब ठेवा. त्याऐवजी चटणी, कोशिंबीर त्यांच्या आहारात समाविष्ट करा.