दूध व्हेज की नॉनव्हेज हे कसे ओळखायचं?

नॉनव्हेज दूध म्हणजे काय आणि ते कसं तयार होतं?

भारत आणि अमेरिकेत दुधावरील व्यापार कराराची चर्चा सुरू झाल्यापासून, मांसाहारी दूध या शब्दावरून बराच गोंधळ उडाला आहे. त्यामुळे ते ओळखायचं कसं?

अमेरिका, युरोप, ब्राझील, थायलंड, ऑस्ट्रेलिया, फिलीपिन्स, जर्मनी, जपान सारख्या अनेक देशांमध्ये गायींना मांसाहारी चारा दिला जातो.

मृत प्राण्यांची हाडे किंवा मांस किंवा रक्तातील पदार्थ गायींना चारा म्हणून दिला जातो. तसेच माशांची पावडर देखील दिली जाते, ज्यामुळे प्रथिने वाढतात.

भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व दुधाच्या पाकिटावर 'शुद्ध शाकाहारी' असे लिहिलेले असते. गायीला फक्त शाकाहारी खाद्य दिले जात आहे.

कोणत्याही अन्नपदार्थावर हिरवा टॅग असतो, जो ते शुद्ध शाकाहारी असल्याचे सांगतो. जर दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांवर कोणतेही चिन्ह नसेल तर तपासून घ्या.

परदेशातून आयात होणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांवर 'rBST फ्री' किंवा 'हार्मोन फ्री' लिहिलेले असते. जर ते लिहिले नसेल तर ते मांसाहारी दूध असण्याची शक्यता असते.

जेव्हा बाहेरून दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ खरेदी करता तेव्हा ब्रँडच्या वेबसाइटला भेट द्या आणि ते गायींना कोणत्या प्रकारचा खाद्य देतात याची माहिती घ्या.

साधारणपणे, गावातील किंवा स्थानिक डेअरीमधून दूध खरेदी करणे चांगले असते, कारण तिथे गायींना फक्त शुद्ध शाकाहारी चाराच दिला जातो.

Click Here