कशासाठी घेतलं जातंय कर्ज?
सध्या अनेक लोक छोट्या-मोठ्या कारणांसाठी सतत कर्ज घेत आहेत. बऱ्याच वेळा आपल्या काही सवयींमुळे आपण पैसे वाचवू शकत नाही.
कर्जातून कोणाला घराचं डागडुजीचं काम करायचं आहे, कोणाला नवीन मोबाइल घ्यायचा आहे, तर कोणाला मुलाच्या शिक्षणासाठी खर्च भागवायचा आहे.
अनेक जण प्रचंड व्याजदर असतानाही कर्ज घेत आहेत. यामुळे तुम्ही कर्जाच्या सापळ्यात अडकत आहात. यातून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवं?
वेळेवर कर्ज न फेडल्यास भविष्यात मोठे कर्ज मिळण्याची शक्यता कमी असते. छोट्या कर्जावरील व्याजदर खूपच जास्त असतो.
सतत कर्ज फेडण्याच्या तणावामुळे चिंता, नैराश्य वाढते. आर्थिक ओढाताणीमुळे घरात वाद, असमाधान वाढू शकते.
महागाईचा वाढता प्रभाव तसेच सहज मिळणारे कर्ज यामुळे याचे प्रमाण वाढलं आहेत. त्यामुळे ते घेणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे.
लग्नसमारंभ, सणवार, महागडे मोबाइल, गाड्या, फॅशनेबल वस्तूंचा हव्यास यासारख्या चैनीच्या वस्तूदेखील कर्जासाठी कारणीभूत आहेत.
कर्ज घेण्याआधी विचार करा. ते आवश्यक आहे का? न घेता काही पर्याय आहे का? याचा गांभीर्याने विचार करा.
महिन्याचे बजेट तयार करा आणि ते पाळा. एकावेळी एकच कर्ज ठेवा. अनेक कर्ज न घेता आधीचं कर्ज फेडून मगच पुढचं घ्या.