फोनमध्ये चोरून लपवलेले अॅप्स कसे शोधाल?

तुमच्या फोनमध्ये लपवलेले अ‍ॅप्स अशा प्रकारे शोधू शकता

भक्तांच्या मोबाईलमध्ये छुप्या पद्धतीने अॅप डाउनलोड करून त्यांचे खासगी क्षण पाहणाऱ्या प्रसाद बाबा उर्फ प्रसाद तामदार याला पुणे पोलिसांनी अटक केली.

प्रसाद बाबा त्याच्या मठात आलेल्या भक्तांचे मोबाईल फोन मागून घ्यायचा आणि ग्रहदोष असल्याने कंपास अ‍ॅप डाउनलोड करावं लागेल असं सांगायचा.

मात्र ते अॅप डाउनलोड करताना तो एअर ड्रॉइड कीड हे आणखी एक अ‍ॅप चोरून डाउनलोड करायचा. या अ‍ॅपमुळे भक्ताच्या संपूर्ण मोबाईलचा एक्सेस प्रसाद बाबाला मिळायचा.

तुमच्या फोनमध्ये लपलेले अ‍ॅप्स आहेत असे वाटते का?  या अ‍ॅप्स तुमचा डेटा गुप्तपणे बाबा सारख्या लोकांना मिळतो. असं होऊ नये वाटत असेल तुमच्या मोबाईलमध्ये काही  सेटिंग्ज करा.

Heading 2

आधी तुम्हाला अँड्रॉइड फोनच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला अ‍ॅप्सचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा.

तिथे See All Apps चा ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक करताच, फोनमध्ये असलेले सर्व अॅप्स तुमच्या स्क्रीनवर दिसतील.

जर तुम्हाला असे अॅप दिसले जे तुम्ही डाउनलोड केलेले नाही, तर तुम्ही ते तिथूनच डिलीट  करू शकता.

तुम्हाला अॅप्स मेनूमध्येच Special App Access मिळेल. त्यावर क्लिक केल्याने तुम्हाला त्या अॅप्सची माहिती मिळेल ज्यांना स्पेशल अॅक्सेस देण्यात आला आहे.

याशिवाय, तुम्ही अ‍ॅप ड्रॉवर वापरून लपवलेले अ‍ॅप्स शोधू शकता. युजर्सना अँड्रॉइड फोनमध्ये अनेक कस्टमायझेशन मिळतात.

Click Here

Your Page!