आता अवघ्या २५ रूपयांत बनवा नवीन Voter ID; असा करा अर्ज 

हे नवीन कार्ड टिकाऊ, वॉटरप्रुफ आणि स्मार्ट सुरक्षा वैशिष्ट्यांसह येईल, जाणून घ्या फायदे

भारतात मतदार कार्ड केवळ निवडणुकीत मतदान करण्यासाठी आवश्यक नाही तर ते एक महत्त्वाचे ओळखपत्र देखील आहे

आतापर्यंत बहुतेक लोकांकडे असलेले मतदार कार्ड कागदाचे होते आणि ते सहजपणे फाटले जात असे, पाण्याने खराब व्हायचे

या समस्येचे निराकरण करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) आता PVC मतदार ओळखपत्र वाटप सुरू केले आहे

हे कार्ड प्लास्टिकपासून बनलेले आहे. होलोग्राम, मायक्रोटेक्स्ट आणि क्यूआर कोड यासारख्या नवीन सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश आहे

PVC मतदार कार्ड मिळविण्यासाठी ECI च्या www.nvsp.in वेबसाईटवर जावं लागेल, तिथे "Order PVC Voter ID” पर्यायावर क्लिक करा

EPIC क्रमांक टाकल्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल, तो भरल्यानंतर Preview पाहा आणि २५ रुपये शुल्क ऑनलाइन भरा

पेमेंट यशस्वी झाल्यानंतर तुमची ऑर्डर निश्चित केली जाईल. मग निवडणूक आयोग हे कार्ड तुमच्या पत्त्यावर १५ दिवसांच्या आत पोहोचवेल.

Click Here