प्लास्टिकच्या पिशवीत भाजी ठेवल्यामुळे ती लवकर सडते.
बाजारातून आणलेली भाजी आठवडाभर ताजी रहावी यासाठी काही टिप्स पाहुयात.
कोणतीही भाजी कधीही स्टोर करण्यापूर्वी ती कापडी पिशवीत ठेवावी. प्लास्टिकच्या पिशवीत भाजी ठेवल्यामुळे ती लवकर सडते. त्यामुळे कापडी पिशवीचाच वापर करावा.
पालेभाज्या स्टोर करतांना त्या निवडून एका टिश्शू पेपरमध्ये गुंडाळून ठेवाव्यात. यामुळे पालेभाजी ३-४ दिवस ताजी रहाते.
जर तुम्ही भाजी निवडून किंवा चिरुन ठेवत असाल तर त्यासाठी कायम हवाबंद डब्याची निवड करा.
गाजर, काकडी, बीट यांसारख्या भाज्या कोणत्याही पिशवीशिवाय थेट फ्रीजच्या क्रिस्पर ड्रॉवरमध्ये ठेवल्या तरी चालतात.