पोटात वारंवार गॅस तयार होतो? हे उपाय करा...

संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करुन तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता.

पोटात वारंवार गॅस तयार होणे, पोट फुगणे किंवा अस्वस्थ वाटणे हे तुमच्या आहार आणि खाण्याच्या सवयींचा परिणाम असू शकतो.

काही पदार्थ असे आहेत, जे पचण्यास जास्त वेळ घेतात आणि गॅस निर्माण करतात. गॅस तयार होण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने गंभीर समस्या उद्भवू शकतात.

अनेकांना वाटते की, गॅस फक्त तेलकट किंवा मसालेदार अन्नामुळेच तयार होतो. पण, काही निरोगी पदार्थ देखील गॅस निर्माण करू शकतात. 


आहारात बदल करून आणि खाण्याची योग्य पद्धत अवलंबून गॅसची समस्या मोठ्या प्रमाणात रोखता येते.

राजमा, हरभरा, मसूर आणि तूरीमध्ये फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, परंतु त्यामधील ऑलिगोसॅकराइड्स नावाची साखर पचण्यास कठीण असते, ज्यामुळे गॅस होतो.


कोबी, फुलकोबी, ब्रोकोलीमध्ये सल्फर आणि फायबर जास्त प्रमाणात असते, जे पचन दरम्यान गॅस निर्माण करतात. 

सोडा, कोल्ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्समध्ये कार्बन डायऑक्साइड वायू असतो, ज्यामुळे पोटात गॅस वाढतो. याशिवाय, काही दुग्धजन्य पदार्थामुळेही गॅस तयार होतो.

पॅक केलेले स्नॅक्स, बर्गर, पिझ्झा आणि तेलकट पदार्थांमध्ये सोडियम आणि ट्रान्स फॅटचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पचन मंदावते आणि गॅस होतो.

अन्न हळूहळू खा - लवकर खाल्ल्याने पोटात हवा जाते, ज्यामुळे गॅस होतो. योग्य वेळी पाणी प्या - खाल्ल्यानंतर लगेच जास्त पाणी पिऊ नका, त्यामुळे पचन मंदावते.

Click Here