दररोज किती पाणी प्यायला हवं? जाणून घ्या

पाणी शरीरासाठी महत्वाचे आहे, त्यामुळे पाणी नियमित पिणे गरजेचे आहे.

पाण्याची गरज वय, दिवसभरातील आपल्या शारीरिक हालचाली, हवामान आणि आरोग्य स्थितीवर अवलंबून असते.

दररोज आठ ग्लास (दोन लीटर) पाणी प्यावे. परंतु, हा सल्ला प्रत्येकाच्या जीवनशैली किंवा गरजांनुसार योग्य ठरत नाही.

यूएस नॅशनल अकादमी पुरुषांसाठी दररोज ३.७ लीटर आणि महिलांसाठी २.७ लीटर पाणी पिण्याची शिफारस करते.

आपल्या शरिराला २०% हायड्रेशन फळे, भाज्या आणि सूप यांसारख्या पदार्थांमधून येते. म्हणजेच तज्ज्ञ सांगतात त्यापैकी किमान २० टक्के पाणी हे आपल्याला अन्नाद्वारे मिळालेलं असतं.

शारीरिक हालचाली आणि हवामान महत्त्वा चे: जर तुम्ही व्यायाम करत असाल, उष्ण हवामानात राहत असाल किंवा खूप घाम येत असेल तर तुम्हाला जास्त पाण्याची आवश्यकता असेल. 

गडद पिवळ्या रंगाची लघवी होणे, तोंड कोरडे होणे, सत थकवा जाणवणे, सतत डोकेदुखी होणे ही डिहायड्रेशनची सुरुवातीची लक्षणं आहे.

जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील सोडियमची पातळी कमी होऊ शकते. याला हायपोनेट्रेमिया म्हणतात, हे देखील धोकादायक आहे. त्यामुळे संतुलन सर्वात महत्त्वाचं आहे.

Click Here