सोनम वांगचुक सध्या चर्चेत आहे. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
'लडाख'मधील शिक्षणतज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना लडाखमध्ये झालेल्या हिंसाचारासाठी जबाबदार धरण्यात आले आहे.
सोनम वांगचुक यांच्या स्वयंसेवी संस्थांच्या खात्यांमध्ये अनेक कथित आर्थिक अनियमितता आढळल्यानंतर तपास यंत्रणा त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
सोनम वांगचुक यांच्या संस्थांवर परदेशी निधी स्वीकारण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
सोनम वांगचुक यांच्या वक्तव्यांमुळे आणि चिथावणीखोर विधानांमुळे लडाखमध्ये हिंसाचार झाला असावा, यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला,असा केंद्र सरकारला संशय आहे.
लडाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि आदिवासी समुदायांसाठी वाढीव स्वायत्तता व सुरक्षा मागण्यासाठी उपोषण सुरू केले होते.
हे उपोषण शांततापूर्ण मार्गाने होते तरी, आंदोलनादरम्यान लेहमध्ये हिंसक संघर्ष उसळला, ज्यामुळे जीवितहानी झाली.
१९६६ मध्ये लडाखमधील उलेतोकपो येथे जन्मलेल्या सोनम वांगचुक यांनी शैक्षणिक सुधारणा आणि पर्यावरणीय उपक्रमांमध्ये मोठे काम केले आहे.
१९८८ मध्ये स्थापन केलेल्या स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाखचे संस्थापक म्हणून सोनम वांगचुक यांनी पारंपारिक शिक्षण प्रणालींना आव्हान दिले आहे.
सोनम वांगचुक यांचा मोठा सामाजिक प्रभावा असूनही, अहवालांनुसार त्यांची एकूण संपत्ती अंदाजे ७५ लाख रुपये इतकीच आहे.
यातील बहुतांश उत्पन्न त्यांना त्यांच्या लोकप्रिय YouTube चॅनेल @wangchuksworld मधून मिळते. त्यांच्या चॅनचे १.७ दशलक्षाहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत.