माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २००२ पासून राजकारणात सक्रिय आहेत.
उद्धव ठाकरे नेहमी राजकीय वर्तुळात चर्चेत असतात.
बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून उद्धव ठाकरे यांनी २००२ मध्ये बीएमसी निवडणुकीत शिवसेनेला मोठा विजय मिळवून दिला.
उद्धव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी झाला.
त्यांनी शालेय शिक्षण बालमोहन विद्या मंदिर दादर येथून केले.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सर जे.जे. कला महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली.
उद्धव ठाकरे यांना फोटोग्राफीची आवड आहे.
उद्धव ठाकरे यांनी २०१० मध्ये 'महाराष्ट्र देश' आणि २०११ मध्ये 'पहावा विठ्ठल' ही दोन फोटो बुक्स प्रकाशित केली.