कॉफी दिवसातून किती वेळा प्यायची?

आपल्याकडे अनेकांना कॉफी पिण्याची सवय असते. 

कॉफी दिवसातून 1-2 कप पुरेशी आहे. आणि शरीरासाठी चांगली जास्त कॉफी घेतल्यास झोपेवर, मनःस्थितीवर आणि पचनावर वाईट परिणाम होतो.

सकाळी उठल्यावर लगेच कॉफी घेतल्यास हार्मोनल असंतुलन होऊ शकतं. उठल्यावर 1-2 तासांनी कॉफी पिणं योग्य.

रात्री कॉफी पिणं टाळाच,झोपण्याच्या 6 तास आधी कॉफी टाळावी. कॅफीनमुळे झोप उशीराने लागते किंवा अपुरी होते.

रिकाम्या पोटी कॉफी घेऊ नका.उपाशी पोटी कॉफी घेतल्यास अॅसिडिटी, गॅस किंवा उलट्या होऊ शकतात.

ब्लॅक कॉफीपेक्षा दूध असलेली कॉफी चांगली असते..ब्लॅक कॉफी जास्त ऍसिडिक असते. थोडं दूध टाकल्यास पचनास मदत होते.

जास्त साखर टाळलेली बरी,साखर जास्त वापरल्यास वजन वाढू शकतं. शक्य असल्यास कमी साखर किंवा गूळ वापरा.

पाणी जास्त प्या..कॉफीमुळे शरीर डिहायड्रेट होतो. म्हणून दिवसभर पुरेसं पाणी प्यावं.

 वर्कआउटनंतर कॉफी उपयोगी ठरते. जिम किंवा योगानंतर कॉफी घेतल्यास ऊर्जा मिळते आणि मेंदू जागा होतो.

प्रेग्नेंसी, बीपी किंवा हृदयरोगात डॉक्टरचा सल्ला घ्या..अशा स्थितीत कॅफीन धोकादायक ठरू शकतो.

Click Here