एखाद्या व्यक्तीला किती हृदयविकाराचे झटके येऊ शकतात?
काल कोल्हापूर जिल्ह्यातील दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू झाला.
सध्या हृदयविकाराचे आजार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. जास्त वय असणाऱ्यांना याचा त्रास जास्त आहे पण , आता कमी वयातील लोकांनाही हा त्रास सुरू झाला आहे.
ज्यावेळी आपण जास्त चरबीयुक्त पदार्थ खातो तेव्हा आपल्या हृदयाच्या धमन्यांमध्ये वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे धमन्यांमध्ये अडथळा येऊ लागतो.
अनियमित जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमधील निष्काळजीपणामुळे, लोकांना खूप कमी वयात हृदयविकाराच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.
अस्वास्थ्यकर आहारामुळे, उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, हृदयात ब्लॉकेजची समस्या उद्भवू लागते.
एखाद्या व्यक्तीला त्याच्या संपूर्ण आयुष्यात किती वेळा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हा प्रश्न अनेकांना पडतो.
एखाद्या व्यक्तीला त्याच्या संपूर्ण आयुष्यात तीन वेळा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, साधारणपणे असे दिसून येते .
तिसऱ्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर, हृदय इतके कमकुवत होते की चौथ्या हृदयविकाराच्या झटक्यात रुग्णाच्या वाचण्याची शक्यता कमी होते.
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर अनेक प्रकारचे सिग्नल देऊ लागते.
श्वास घेण्यास त्रास होणे, जास्त घाम येणे, छातीत दुखणे, चक्कर येणे आणि अस्वस्थता ही याची लक्षणे आहेत.