धरणातील पाणी 'क्युसेक'मध्ये कसे मोजतात?

पावसाळ्यात धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जातो. हे पाणी 'क्युसेक' मध्ये मोजले जाते. 

पावसाळ्यात धरण मोठ्या प्रमाणात भरली जातात. पाण्याचे नियोजन करण्यासाठी पाण्याचा विसर्ग वाढवला जातो. 

काल झालेल्या मुसळधार पावसामुळे, कोयना, चांदोली, राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.

घनफूट मोजणे
धरणातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग मोजला जातो.

एक घनफूट प्रतिसेकंद म्हणजेच क्यूब फूट पर सेकंद याचा अर्थ क्युसेक असा होतो. एक घनफूट पाणी म्हणजे २८.३१ लिटर पाणी.

ज्यावेळी धरणातून १ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातो, त्यावेळी धरणातून २८.३१० लिटर पाणी प्रति सेकंदाला नदीपात्रात सोडले जाते.

कोणत्याही धरणातून जर २४ तासांत सतत ११ हजार ५०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला, तर त्या धरणाची पातळी २४ तासांनंतर एक टीएमसी अर्थात (एक हजार दशलक्ष घनफूट) ने कमी झालेली असते.

क्युसेकमध्ये पाणी घनफुटामध्ये मोजले जाते, तर क्युमेकमध्ये पाणी घनमीटरमध्ये (क्युबिक मीटर पर सेकंद) मोजले जाते. 

एक क्युमेक पाणी म्हणजे प्रतिसेकंद १,००० लिटर पाणी म्हणजेच १,००० क्युमेक या प्रमाणात पाणी सोडले जात असेल, तर १,००० x १,००० असे १० लाख लिटर पाणी प्रतिसेकंद या वेगाने नदीपात्रात सोडले जाते.

सर्वदूर चांगला पाऊस होतो तेव्हा धरणे भरत असतात. अशावेळी काही धरणांमधून पाणी सोडले जाते. इतके टीएमसह पाणी जमा झाले, तितके क्युसेक पाणी सोडले, असे आपल्या वाचण्यात येते. 

सरळ किंवा वक्र, अशा दोन प्रकारचे दरवाजे तयार केले जातात. पाण्याचा दाब अधिक असल्यास तो सहन करण्यासाठी वक्र गेट तयार केले जातात, तर पाण्याचा दाब कमी असल्यास त्या धरणाला सरळ गेट तयार केले जातात.

Click Here