उत्तरकाशीमध्ये खीरगंगा इथं ढगफुटी झाल्यानं पुराच्या पाण्याने गावं आणि स्थानिकांना गिळंकृत केले आहे.
उंच प्रदेशात ढगफुटीची शक्यता अधिक असते. अनेकदा ढगफुटीचे प्रकार हे हिमालयाच्या पर्वतरांगांमध्येच होतात. यापूर्वीही ढगफुटीच्या अनेक घटना इथे झाल्या आहेत.
मध्य भारतातील मैदानी प्रदेशावर मान्सूनचा पाऊस पडून गेलेला असतो. त्यातून निर्माण झालेल्या बाष्पाचे ढग उत्तरेकडे सरकतात. उंचावरील थंड हवेने ते मोठ्या थेंबाच्या पाण्याच्या स्वरूपात कोसळतात.
मोसमी पाऊस उत्तरेकडे वाटचाल करत असतानाच्या काळात आणि मोसमी पाऊस देशातून माघारी जात असताना ढगफुटीसदृश पाऊस पडतो. हा पाऊस चार- पाच किलोमीटरच्या परिघात पडतो.
दाट लोकवस्तीच्या, उंचच उंच इमारती असलेल्या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस पडण्याच्या घटना वाढल्याने त्यामुळे होणारे नुकसान खूप मोठं आहे.
वादळी पावसाला घेऊन येणारे ढग यामध्ये असतात. गरम हवा, आद्रर्तेमुळे ढगांमधील पाण्याचे प्रमाण वाढते. पाण्याचे अब्जावधी थेंब ढगांमध्ये जातात आणि जोरदार पाऊस पडतो.
डोंगराळ भागात, जेव्हा हवा पर्वतांवर आदळते तेव्हा ती वर येते, ज्यामुळे हवा थंड होते आणि ओलावा सोडते. या प्रक्रियेमुळे ढगांमध्ये पाण्याच्या कणांचे प्रमाण वाढते, ज्यामुळे ढगफुटी होते.
डोंगराळ भागात तीव्र उतार असतात, ज्यामुळे ढग तेथून वर जातात तेव्हा आर्द्रता थंड होते आणि मुसळधार पाऊस किंवा ढग फुटतात. मैदानी भागात अशी उंची नसते, त्यामुळे ढग फुटण्याची शक्यता कमी असते.
डोंगराळ भागात बेकायदेशीर खाणकाम, वृक्षतोड आणि बेकायदेशीर बांधकामे जमीन अस्थिर करतात. या कृतींमुळे मुसळधार पावसात ढगफुटीमुळे होणारे नुकसान वाढते.