फोनची स्क्रीन तुमचा स्पर्श कसा ओळखते?

मोबाईलला स्क्रिनवर जिथे आपण टच करतो बरोबर तिथेच क्लिक कसे काय होते? 

आपण मोबाईल वापरताना स्क्रीनवर बोट ठेवताच तो प्रतिसाद देतो. कधी कॉल लागतो, कधी फोटो झूम होतो, तर कधी गेम सुरू होतो. पण हे सगळं नेमकं कसं घडतं? याचं उत्तर आहे, टचस्क्रीन टेक्नॉलॉजी.

स्मार्टफोनमध्ये कॅपॅसिटिव्ह टचस्क्रीन वापरली जाते. वरच्या थरावर पारदर्शक इंडियम टिन ऑक्साइड नावाचं एक खास इलेक्ट्रिक घटक लावलेला असतो. यामुळे संपूर्ण स्क्रीनवर एक हलका विद्युत चार्जचा पातळ थर असतो.

 बोटांनी स्क्रीनला स्पर्श करतो, तेव्हा आपल्या शरीरात असलेल्या सूक्ष्म विद्युत प्रवाहामुळे त्या भागातील चार्जमध्ये बदल होतो. स्क्रीनमधील सेन्सर्स हा बदल ओळखतात. 

प्रोसेसर लगेच त्या ठिकाणाशी संबंधित आदेश अंमलात आणतो, जसं की आयकॉन उघडणं, स्क्रोल करणं किंवा झूम करणं.

पूर्वीच्या मोबाईलमध्ये रेझिस्टिव्ह टचस्क्रीन वापरली जायची, जिथं दोन थर एकमेकांशी संपर्कात आल्यावर दाबाने सिग्नल तयार होत असे.

मात्र आजच्या कॅपॅसिटिव्ह स्क्रीन अधिक संवेदनशील, टिकाऊ आणि मल्टी-टच म्हणजे एकाचवेळी दोन-तीन बोटांनी वापरता येणारी असतात.

मोबाईल आपल्या स्पर्शाला विद्युत चार्जच्या बदलातून ओळखतो. म्हणूनच जर तुम्ही हातमोजे घातले असतील किंवा स्क्रीन ओली असेल, तर ती टच योग्यरीत्या काम करत नाही, कारण त्या वेळी विद्युत प्रवाह व्यवस्थित पोहोचत नाही.

Click Here