इथिओपियात तब्बल १२ हजार वर्षांनंतर हेली गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक झाला.
मॅग्माची निर्मिती पृथ्वीच्या खोलवर प्रचंड उष्णतेमुळे काही खडक वितळतात आणि 'मॅग्मा' नावाचा जाड, वाहणारा पदार्थ तयार होतो.
मॅग्माचे संचय सभोवतालच्या घन खडकांपेक्षा हलका असल्यामुळे, मॅग्मा वरच्या दिशेने सरकतो आणि 'मॅग्मा चेंबर'मध्ये जमा होतो.
दाबाची वाढ मॅग्मामध्ये असलेले वायू आणि वाफेमुळे दाब वाढतो. मॅग्माच्या आत तयार होणाऱ्या वायूचा दाब इतका वाढतो की तो ज्वालामुखीचा स्फोट घडवू शकतो.
सौम्य उद्रेक जर मॅग्मा पातळ आणि सहज वाहणारा असेल, तर तो हळूहळू लाव्हा म्हणून बाहेर पडतो.
स्फोटक उद्रेक जर मॅग्मा खूप घट्ट असेल आणि त्यात जास्त वायू असतील, तर स्फोट खूप शक्तिशाली असतो. यामध्ये राख, खडक आणि धूळ आकाशात फेकली जाते.
लावा आणि इतर पदार्थ जेव्हा मॅग्मा पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतो, तेव्हा त्याला 'लावा' म्हणतात. स्फोटातून राख, गरम वायू आणि खडकाचे तुकडे बाहेर पडतात, ज्याला 'पायरोक्लास्टिक पदार्थ' म्हणतात.