इन्फ्रारेड (IR) सेन्सर- टीव्ही रिमोटमध्ये इन्फ्रारेड लाइटचा वापर केला जातो. आपण बटण दाबताच रिमोटमधून एक अदृश्य IR सिग्नल बाहेर पडतो.
प्रत्येक बटणाचा वेगळा सिग्नल- व्हॉल्यूम, चॅनल किंवा पॉवर बटणासाठी वेगवेगळे कोड असतात. त्यामुळे टीव्हीला कोणते कमांड दिले आहे हे समजते.
टीव्हीमधील सेन्सर सिग्नल ओळखतो- टीव्हीच्या पुढील बाजूस IR रिसीव्हर असतो. तो रिमोटमधून आलेला सिग्नल पकडून त्यानुसार काम करतो.
बॅटरीमुळे रिमोट चालतो- रिमोटमधील बॅटरी सर्किटला ऊर्जा पुरवते. बॅटरी संपल्यास सिग्नल पाठवला जात नाही आणि रिमोट काम करत नाही.
स्मार्ट रिमोट्स - नवीन स्मार्ट टीव्ही रिमोट्समध्ये Bluetooth किंवा Voice Control तंत्रज्ञान असते. त्यामुळे रिमोट टीव्हीकडे न दाखवता देखील काम करतो.