पावसाळ्यात कशी घ्याल केसांची काळजी? १० टिप्स तुमच्या उपयोगाला येतील 

केसांची काळजी घेणे सध्या महत्वाचे आहे. 

 पावसाचे पाणी केसांवर जाऊ देऊ नका
पावसाचे पाणी अनेकदा प्रदूषित आणि ऍसिडिक असते. यामुळे स्काल्पवर इन्फेक्शन होऊ शकते आणि केस गळतात. जर केस भिजलेच, तर शक्य तितक्या लवकर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

नेहमी केस कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा
दमट हवामानात केस सतत ओले राहिले, तर बुरशीजन्य संक्रमण होऊ शकते. ओले केस नीट कोरडे करा, विशेषतः मुळांपर्यंत कोरडे करा. 

माइल्ड (सौम्य) शॅम्पू वापरा आणि नियमित धुवा
पावसाळ्यात घाम, प्रदूषण आणि पावसाचे पाणी यामुळे स्काल्पवर साचलेले तेल आणि मळ घालवण्यासाठी सौम्य शॅम्पू वापरा. आठवड्यातून २-३ वेळा केस धुणे योग्य.

 कंडिशनर वापरणे विसरू नका
दमट हवामानामुळे केस गुंततात, रफ वाटतात. शॅम्पूनंतर कंडिशनर लावल्याने केस मऊ होतात आणि तुटत नाहीत.

डॅंड्रफपासून संरक्षण घ्या
आर्द्रतेमुळे डॅंड्रफ होण्याची शक्यता वाढते. दर आठवड्यात एकदा एंटी-डॅंड्रफ शॅम्पू वापरा, विशेषतः जर खवखव जाणवत असेल तर उपाय करा.

ओले केस कधीही जोरात पुसू नका
ओले केस टॉवेलने जोरात घासल्यास  तुटतात. त्याऐवजी टॉवेलने सौम्य थोपटूनच केस कोरडे करा.. डॅमेज होण्यापासून वाचतील 

सैल केस बांधा
टाईट पोनीटेल किंवा वेणीने केस ओलसर हवामानात जास्त नाजूक बनतात. सैल केस बांधल्याने मुळांवरचा ताण कमी होण्यास मदत होईल. 

तेल लावा, पण अति नको 
दमट हवामानात तेल लावून दीर्घकाळ राहिल्यास स्काल्पवर चिकटपणा होतो, त्यामुळे तेल लावून 1 ते 2 तासात केस धुवून टाका.

सातत्याने केसांची ट्रिमिंग करा
दमट हवामानात स्प्लिट एंड्स वाढतात. दर 4 ते 6 आठवड्यांनी थोडं ट्रीमिंग केल्याने केस निरोगी राहतील. 

केसांसाठी संतुलित आहार घ्या
केसांचं आरोग्य फक्त बाहेरून नाही तर आतूनही जपा.. अंडी, पालक, बदाम, दही, डाळी, हिरव्या भाज्या खा..

Click Here