घरच्या जनावरांना साप चावला हे कसे ओळखाल, काय कराल उपाय?

गोठ्यातील जनावारांना साप चावल्यावर त्यांचा बचाव करण्याचे उपाय वाचा

पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी जनावरांना सर्पदंश होतो. दवाखान्यात त्यांच्यावर उपचार करावे लागतात. मात्र उपचाराअभावी खूप मोठे नुकसान होते

सर्पदंश झाल्यानंतर दिसणारी लक्षणे, त्यावरून विषारी की बिनविषारी साप चावला आहे जनावरे सांभाळणाऱ्यांना ओळखणे गरजेचे आहे 

पूरसदृश परिस्थितीमुळे पाण्याच्या प्रवाहाबरोबर अनेक सापांचे स्थलांतर होत असते, अशावेळी पशुपालकांनी जनावरांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे

सर्पदंश झालेल्या ठिकाणी खूप सूज येते. पायावर चावा झाल्यानंतर सुरुवातीला सूज खालच्या बाजूला येते. नंतर मात्र ती वरच्या दिशेने दिसायला सुरुवात होते

नाग दंश झाला तर जनावर थरथरतात, तोंडातून लाळ गळते. जनावरे दात खातात, पापण्याची उघड झाप बंद होते. लाळ गळते. पुढे जाऊन जनावर आडवे पडून झटके देते

विषारी साप चावल्यास दोन खोल जखमा दिसतात. बिनविषारी सर्पदंशात इंग्रजी यू आकारात खरचटल्या प्रमाणे जखमा दिसतात

सर्प दंश टाळण्यासाठी निवारा सुरक्षित करणे, गोठा व परिसरात आडगळ राहणार नाही, दाट कुरणात जनावरे चरायला न सोडणे याची काळजी घेणे

Click Here