अलार्मचं उद्दिष्ट म्हणजे दिलेल्या वेळी युझर्सला उठवणं, मग तो फोन सायलेंटवर असो किंवा नसो. यासाठी अँड्रॉइड आणि iOS दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीममध्ये अलार्मला हायेस्ट प्रायोरिटी ऑडिओ स्ट्रिम देण्यात आली आहे. त्यामुळे अलार्मचा आवाज नोटिफिकेशन्सपेक्षा वेगळ्या अलार्म चॅनेलद्वारे वाजतो.