या रेल्वे स्थानकाला 'करी रोड' नाव कसे पडले? 

मुंबईची लाईफलाईन म्हटलं की वाऱ्याच्या वेगाने धावणारी लोकल गाडी डोळ्यासमोर येते.

दिवसरात्र प्रवाशांचा भार वाहून नेणारी लोकल सेवा गेल्या कित्येक वर्षांपासून अविरतपणे आपली सेवा बजावत आहे.

गाव आणि शहर यांना जोडणारा हा सर्वोत्तम आणि स्वस्तातील मार्ग म्हणून रेल्वेकडे पाहिलं जातं.

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या दोन्ही मार्गावर प्रवास करतांना लोकल खचाखच गर्दीने भरुन जाते. प्रत्येक स्थानकावर गर्दीचा लोंढा लोकलमध्ये शिरत असतो.

मुंबईतील लोकल स्टेशनची नावही भन्नाट आहेत. यातील करी रोड स्टेशन हे प्रसिद्ध आहे.

करी रोड - मुंबईमधील करी रोड या स्थानकाचं नाव सी. करी यांच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे.

१८६५ ते १८७५ या काळात देशात जीआयपी, बीबीसीआय रेल्वे कंपन्यांच्या देखरेखीची जबाबदारी सी. करी यांच्यावर होती.

त्यामुळेच त्यांच्या नावावरुन पुढे या स्थानकाला करी रोड असं नाव देण्यात आलं.

Click Here