लंगडा आंब्याला कसं मिळालं 'लंगडा' हे नाव?

नक्की वाचा, Interesting आहे स्टोरी...!

भारतात दशेरी, केसर, हापूस यांसह आंब्याच्या डझनावर व्हरायटी उपलब्ध आहेत. मात्र, लंगडा आंबा त्याच्या नावामुळे आणि सुगंधामुळे लोकांचे लक्ष वेधून घेतो.

लंगडा आंब्याचे कनेक्शन उत्तर प्रदेशातील वाराणसी शहराशी आहे. त्याला हे नाव येथूनच मिळाले, असा दावा केला जातो.

असे बोलले जाते की, वाराणसीमध्ये एका पायाचे दिव्यांग असलेली एक व्यक्ती राहत होती. या व्यक्तीच्या घराच्या अंगणात एक आंब्याचे झाड होते.

या झाला येणाऱ्या आंब्याचा सुगंधी आणि त्याची चव इतर अंब्यांच्या तुलनेत फारच छान होता. जेव्हा लोकांनी हा आंबा चाखला, तेव्हा त्यांनी या आंब्याला 'लंगडा आंबा' असे नाव दिले.

खरे तर, लंगडा आंब्याच्या कथेला कुठलेली वैज्ञानिक कनेक्शन नाही. मात्र, तो मऊ आणि अतिशय गोड असतो. त्याचा सुगंधही अत्यंत सुंदर असतो.

लंगडा आंब्याची साल पातळ आणि हिरव्या रंगाची असते.

लंगडा आंबा उत्तर प्रदेश आणि बिहार शिवाय उत्तराखंडमध्येही येतो. तथापि, तो उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अधिक खाल्ला जातो.

Click Here