दिवाळीचा 'गोड' इतिहास! घराघरांत भेट म्हणून दिली जाणारी सोनपापडी केवळ मिठाई नाही, तर भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे.
सोनपापडीचा जन्म कुठे झाला? यावर काहीजण महाराष्ट्राचा दावा करतात, तर काहीजण राजस्थानचा! पण या गोड मिठाईचा प्रवास नेमका कुठून सुरू झाला हे कमी लोकांना माहीत आहे.
सोनपापडीचे 'कनेक्शन' थेट तुर्कीयेतील 'पिशमानिये' या पारंपारिक मिठाईशी आहे. पाश्चात्त्य देशातून ही कल्पना भारतात आली.
विशेष म्हणजे, पिशमानिये गव्हाच्या पिठापासून बनते, पण भारतीयांनी त्यात बदल करून चविष्ट बेसन वापरून 'सोनपापडी'ला जन्म दिला.
सुरुवातीला महाराष्ट्राच्या पश्चिम भागात स्थानिक स्तरावर तयार झालेली ही मिठाई; तिच्या हलक्या आणि विरघळणाऱ्या पोतमुळे ती देशभर लोकप्रिय झाली.
सोनपापडी केवळ दिवाळीपुरती मर्यादित राहिली नाही. आकर्षक पॅकेजिंगमुळे ती कॉर्पोरेट गिफ्टिंग आणि फेस्टिव्ह हॅम्पर्सचा महत्त्वाचा भाग बनली आहे.
Your Page!
आज सोनपापडी चॉकलेट, बटरस्कॉच आणि ड्रायफ्रूट्स अशा आधुनिक फ्लेवर्समध्ये उपलब्ध आहे. या मिठाईने काळानुसार स्वतःला यशस्वीरित्या बदलले आहे.