जीवघेणी ठरू शकते ही समस्या...!
झोपेची कमतरता हळूहळू एक "सायलेंट हेल्थ क्रायसिस" बनली आहे.
कमी झोपेचा परिणाम थेट मेंदू, हृदय, रोगप्रतिकारशक्ती आणि मानसिक आरोग्यावर होतो.
हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनात झोपेच्या कमतरतेचे काही धोके सांगितले आहेत.
संशोधनानुसार, जे लोक ५ तासांपेक्षा कमी झोप घेतात, त्यांच्यामध्ये हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका ३०–४० टक्क्यांनी वाढतो.
झोपेची कमतरता शरीरातील सूज वाढवते, यामुळे रक्तदाब आणि शुगर लेव्हल बिघडू शकते.
झोपेची कमतरता लठ्ठपणा वाढवते. कमी झोपणाऱ्या लोकांना कॅलरीची गरज भासू लागते.
एका रात्रीची खराब झोप देखील स्मरणशक्ती, निर्णय घेण्याची क्षमता आणि शिकण्याच्या क्षमता ४० टक्क्यांपर्यंत कमी करू शकते.
झोपेची कमतरता असलेल्या लोकांमध्ये Anxiety आणि डिप्रेशनची शक्यता दुप्पट आढळते.
किशोरवयीन आणि तरुणांमध्ये तर झोपेची कमतरता आजकाल सर्रास दिसू लागली आहे.