डासांचा उपद्रव वाढल्यानंतर त्यांना पळवण्यासाठी अगरबत्त्या, कॉइल, कार्ड, स्प्रे व लिक्विड रिपेलेंट वापरले जातात. मात्र, अनेक नॉन-ब्रँडेड उत्पादनांमध्ये अप्रमाणित व घातक रसायनांचा भरणा असतो.
यामुळे श्वसनविकार, त्वचा, डोळ्यांची जळजळ होणे, मज्जासंस्था बिघाड त्यापुढे जाऊन कर्करोगाचा धोकासुद्धा निर्माण होतो. लहान मुले, वृद्ध आणि गर्भवतींवर या धुराच्या वासाचे दुष्परिणाम गंभीर असतात.
बहुतांशी घरात डास पळविण्यासाठी विविध उत्पादने असतातच, त्यात अगरबत्ती, कॉइल, कार्ड, सो, लिक्विड रिपेलेंट आर्दीचा समावेश असतो. ही उत्पादने शहराबरोबर ग्रामीण भागातही अगदी सहज उपलब्ध होतात.
श्वास गुदमरणे, घसा खवखवणे, खोकला, श्वास लागणे, डोके दुखणे, दमा आणि ब्रॉन्कायटिसचा त्रास असलेल्या रुग्णांना झटके येऊ शकतात. असेही म्हणतात की, एका कॉइलचा धूर हा १०० सिगारेट इतका असतो.
अलेथ्रीन, पायरेथ्रीन, डी ट्रान्स एलेथ्रिन आदी कीटकनाशक रसायने वापरली जातात. ब्रेडेड उत्पादनांमध्ये डोस मर्यादित असतो; परंतु नॉन-ब्रेडेडमध्ये अतिरेक अधिक असतो.
फॉर्मल्डिहाइड, बेंझिन, पॉलिसायक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स यासारखी कर्करोगजन्य रसायने धुरातून बाहेर पडतात. रसायनांचा अतिरेक फुफ्फुसांच्या ऊतींना हळूहळू झिजवतो.
मज्जासंस्थेवर परिणाम होऊन सततच्या संपर्कामुळे मज्जासंस्था कमकुवत होते. चक्कर येणे, झोप न लागणे, डोके जड होणे, असाही त्रास जाणवतो. अभ्यासानुसार कॉइलचा धूर कर्करोगाचा धोका वाढवतो.
त्यामुळे बँडेड, प्रमाणित उत्पादने वापरा, खोलीत हवा खेळती ठेवा, खिडक्या-दारे उघडे ठेवा, मुलांच्या, गर्भवतींच्या व वृद्धांच्या खोलीत अगरबत्ती, कॉइल वापरू नका.