मोबाईल अन् ॲपमधून PF चे पैसे काढणे सोपे; घरबसल्या होईल काम

गरज पडल्यास निवृत्तीपूर्वीही तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून सर्व पैसे काढू शकता

जर तुमच्या पगारातून भविष्य निर्वाह निधी कापला गेला असेल तर आवश्यकता भासल्यास ती रक्कम तुम्हाला मिळू शकते

या प्रकारच्या पैसे काढण्याला 'फुल अँन्ड फायनल विड्रॉल' म्हणतात कारण त्यात तुमचे पीएफ, पेन्शन आणि व्याजाचे पैसे समाविष्ट असतात

जर तुम्ही नोकरी सोडून दोन महिने झाले असतील तर तुम्ही पुढे दिलेल्या प्रक्रियेद्वारे तुमच्या पीएफ खात्यातील सर्व पैसे काढू शकता

पीएफ खात्यातून सर्व पैसे काढण्यासाठी सर्वात आधी EPFO च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तिथे डिटेल्स भरून लॉग इन करावे लागेल

तुम्हाला डॅशबोर्डवर दिसणाऱ्या ऑनलाइन सेवा पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि नंतर क्लेम्स पर्यायावर क्लिक करावे लागेल

यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल. जिथे काही फील्ड आधीच भरलेले असतील आणि काही फील्डमध्ये तुमची माहिती भरावी लागेल

या फॉर्मवर तुम्हाला तुमचा बँक खाते क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. अटी आणि शर्ती स्वीकाराव्या लागतील. त्यानंतर Proceed For Online Claim वर क्लिक करा

Click Here