डायबिटीस होऊ नये म्हणून घ्या 'ही' काळजी! 

लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत अनेकजण सध्या डायबिटीसने त्रस्त आहेत. 

सध्याच्या घडीला मधुमेह हा गंभीर आजार होत चालला आहे. भारतामध्ये मधुमेही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत अनेकजण सध्या डायबिटीसने त्रस्त आहेत. म्हणूनच, डायबिटीस टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील ते पाहुयात.

डायबिटीसला दूर ठेवायचं असेल तर नियमितपणे व्यायाम करा. व्यायामामुळे आपली चयापचया क्रिया नीट राहते. ज्यामुळे शरीरातील साखऱेचं प्रमाण नियंत्रणात राहतं.

जास्त वजन हे मधुमेहाचं एक मुख्य कारण आहे. तुमचे वजन जास्त असल्यास वजन कमी करण्याचा प्रयत्न करा. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. 

जेवताना अनेक वेळा आपण एकाच वेळी भरपूर जेवतो. यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते. म्हणूनच एकाच वेळी जास्त खाण्याऐवजी, थोड्या अंतराने थोडं थोडं खा.

फ्रीजमध्ये ठेवलेलं पनीर कडक झालंय? 

Click Here