इनरवेअर किती दिवसांनी टाकून द्यावी?

सध्या बाजारात इनरवेअरचे असंख्य ब्रँड आहेत. पण, एक इनरवेअर किती दिवस वापरावे हे अनेकांना माहिती नाही.

तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही दररोज तुमचे इनरवेअर बदलणे खूप महत्त्वाचे आहे, खासकरून उन्हाळ्यात.

दिवसभर घाम, त्वचेतील तेल आणि मृत पेशी इनरवेअरवर जमा होतात. यामुळे बॅक्टेरिया वाढतात.

हे बॅक्टेरिया खाज सुटणे, रॅशेस आणि मूत्रमार्गाचे इन्फेक्शन (UTI) यांसारख्या समस्यांना आमंत्रण देतात.

जर तुम्ही व्यायाम करत असाल किंवा जास्त घाम येत असेल, तर वर्कआउट संपल्यानंतर लगेच इनरवेअर बदला.

काही तज्ज्ञ झोपताना इनरवेअर न घालण्याचा सल्ला देतात, कारण यामुळे त्वचेला मोकळी हवा मिळते.

इनरवेअर जुने झाल्यावर किंवा त्यांचा आकार बदलल्यावर ते फेकून द्या. साधारणपणे ६ महिने ते १ वर्षांपर्यंत इनरवेअर वापरता येतात.

इनरवेअर नियमितपणे गरम पाण्याने आणि चांगल्या डिटर्जंटने धुवा. यामुळे बॅक्टेरिया मरतात.

तुमच्या आरोग्यासाठी इनरवेअरची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. 

Click Here

इनरवेअर किती दिवसांनी टाकून द्यावी?