इथेनॉल कसे बनते? पेट्रोलमध्ये का मिसळतात?

स्वच्छ ऊर्जा आणि परदेशी तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉल महत्त्वाचे आहे.

हे ऊस, मका किंवा इतर धान्यांपासून बनवले जाते. भारतात ऊसापासून उत्पादन जास्त होते.

मका दळून पावडर बनवली जाते, तर उसाचा रस काढून मळी वापरली जाते.

तयार मिश्रणात खास एन्झाइम मिसळून स्टार्चचे रूपांतर साखरेत केले जाते.

या मिश्रणात यीस्ट घालून २-३ दिवस किण्वन केले जाते, ज्यामुळे साखर इथेनॉलमध्ये बदलते.

मिश्रण गरम करून इथेनॉलची वाफ वेगळी केली जाते आणि ती थंड करून ९९% शुद्ध इथेनॉल मिळवले जाते.

लोकांनी पिऊ नये यासाठी त्यात कडू रसायने मिसळली जातात, याला विकृतीकरण म्हणतात.

हे शुद्ध इथेनॉल टँकरमध्ये भरून तेल डेपोमध्ये आणले जाते.

येथे, मशीनच्या मदतीने पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिसळले जाते, ज्यामुळे E20 इंधन तयार होते.

मिश्रित इंधन सुरक्षित आहे की नाही याची तपासणी करून नंतर ते पेट्रोल पंपांवर वितरीत केले जाते.

Click Here