डार्क सर्कल घालवण्यासाठी घरगुती उपाय; जाणून घ्या ट्रिक

डार्क सर्कलमुळे अनेकांना त्रास होत आहे.

रोज कापसाच्या बोळ्याने थंड दूध डोळ्यांखाली लावा. 10-15 मिनिटांनी धुवा. दूधातील लॅक्टिक अ‍ॅसिड त्वचा उजळवते.

काकडीचे थंड स्लाइस डोळ्यांवर ठेवा. यामुळे थंडावा मिळतो आणि सूज कमी होते.

बटाट्याचा रस डोळ्यांखाली लावल्याने नैसर्गिक ब्लीचिंग होते आणि डाग कमी होतात.

वापरलेले थंड टी बॅग्स डोळ्यांवर 10-15 मिनिटे ठेवा. अँटीऑक्सिडंट्स सूज आणि डार्कनेस कमी करतात.

शुद्ध एलोवेरा जेल लावल्याने त्वचेचा रंग सुधारतो आणि थकवा कमी होतो.

पुरेशी झोप नसेल तर डोळ्यांखाली डाग येतात. झोप सुधारली की फरक जाणवतो.

पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा.शरीर डिहायड्रेट असल्यास डार्क सर्कल्स वाढतात. रोज 2-3 लिटर पाणी प्या.

झोपण्यापूर्वी बदाम तेलाने हलक्या हाताने मसाज करा. त्वचेला पोषण मिळते.

व्हिटॅमिन K, C, आणि आयरनयुक्त पदार्थ खा. पालक, संत्री, सुकामेवा उपयुक्त ठरतो.

बाहेर जाताना सनग्लासेस व सनस्क्रीन वापरा. यूव्ही किरणांनी डोळ्यांभोवती काळसरपणा वाढतो.

Click Here