केसगळती थांबविण्यासाठीचे घरगुती उपाय

वातावरण बदल किंवा आहारात बदल झाला की अनेकांना केसगळतीची समस्या जाणवते. 

वातावरण बदल किंवा आहारात बदल झाला की अनेकांना केसगळतीची समस्या जाणवते. केस गळती थांबवायची असेल तर नारळाचं दूध केसांच्या मुळाशी लावा. आणि, हलक्या हाताने मालिश करा.

केसांना कांद्याचा रस लावला तरी केसांच्या वाढीस मदत मिळते. 

मेथीचे दाणे रात्रभर भिजवून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना लावल्यास केसगळती कमी होते.

बीट पावडर आणि मेहंदी पावडर एकत्र मिक्स करुन त्याची पेस्ट केसाला लावल्यास केस गळने कमी होते.

केसगळती थांबवण्यासाठी कोरफड अतिशय परिणामकारक आहे. कोरफडीचा गर केसाला लावल्यास केस गळणे थांबते तसेच केसांची वाढ होण्यास मदत मिळते.

आवळ्याची पावडर आणि लिंबाचा रस  डोक्याला लावल्यास केस गळण्याचे प्रमाण कमी होते तसेच केसांना चमक येते.

फ्लेवर पाहून टूथपेस्ट खरेदी करता? मग आताच थांबा!

Click Here