मंडीच्या त्या भयानक रात्री 'रॉकी' ने ६७ लोकांना वाचवलं
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील सियाठी गावात रॉकीने त्याच्या मालकाला जागे करून संपूर्ण गावाला मृत्यूपासून वाचवले.
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील सियाठी गावाला ३० जून २०२५ च्या मध्यरात्री अचानक आलेल्या पुराचा जबरदस्त तडाखा बसला असून, संपूर्ण गाव उद्ध्वस्त झालं.
गावातील रहिवासी नरेंद्र यांनी सांगितलं की, ३० जूनच्या रात्री १२ ते १ च्या सुमारास, दुसऱ्या मजल्यावर असलेला कुत्रा जोरात भुंकू आणि नंतर रडू लागला होता.
त्या कुत्र्याच्या आवाजामुळे नरेंद्र झोप उडाली आणि ते खाली उतरताच त्यांच्या लक्षात आलं की घराला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. तसेच पाण्याचा प्रवाह गावाकडे येत आहे.
नरेंद्र यांनी लगेचच त्यांच्या कुटुंबाला जागं केलं आणि सर्वांना सुरक्षित स्थळी हलवलं. यासोबत त्यांनी इतर गावकऱ्यांनाही याची माहिती दिली.
आता सध्या संपूर्ण गावात फक्त ४–५ घरं उरली आहेत. बाकी सर्व काही मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत.
हिमाचलमध्ये विविध भागात झालेल्या ढगफुटी व मुसळधार पावसामुळे एकूण ७२ जणांचा मृत्यू झाला असून, ३७ जण बेपत्ता आहेत.
"जर त्या रात्री रॉकी भुंकला नसता, तर आज आम्ही कोणीही जिवंत नसतो," असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.