बर्फाळ प्रदेशात फिरण्याचा प्लॅन करण्याआधी सुप्रीम कोर्टानं कुणाला फटकारलंय ते पाहा
सुप्रीम कोर्टाने हिमाचल प्रदेशात वाढणाऱ्या नैसर्गिक संकटाबाबत इशारा देत सरकारला जाब विचारला आहे
मागील काही काळात हिमाचल प्रदेशात पूर, अतिवृष्टी यामुळे मोठ्या प्रमाणात जीवनमान बदललेले दिसून येत आहे
निसर्ग समृद्धीने नटलेले हिमाचल प्रदेश मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक संकटात सापडले आहे याबाबत कोर्टाने नाराजी व्यक्त केली
जर हे यापुढे असेच सुरू राहिले तर हिमाचल प्रदेश नकाशातून गायब होईल, ते पाहताही येणार नाही अशी चिंता कोर्टाने मांडली
वारंवार पूर, भूस्खलन यासारखी संकटे वाढली आहेत. शेकडो जीव गेले, घरे-दुकाने उद्ध्वस्त झाली असं कोर्टाने म्हटलं
हायवे, बोगदे बनवण्यासाठी विना विचार डोंगर फोडले जातात, नद्यांमध्ये वीज प्रकल्पांमुळे जलचर प्राणी संपत चाललेत
रस्ते बनवण्यासाठी स्फोट घडवले जातात, त्यामुळे डोंगर कमकुवत झालेत. पर्यावरणाला नुकसान पोहचवून महसूल कमवू शकत नाही असं कोर्टाने स्पष्ट केले