घटस्फोट घेताना ‘या’ सेलिब्रिटीनीं दिली कोट्यवधी रुपये पोटगी...

कोणते प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्स आपल्या बायकोला किती पोटगी देतात, ते पाहा...

बॉलिवूडमधील मोठे स्टार्स आणि क्रिकेटच्या दुनियेत चमकणारे खेळाडू यांचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय ठरतं. 

अनेकदा त्यांच्या नात्यात दुरावा आल्यावर किंवा घटस्फोट झाल्यावर त्यांना पोटगीची प्रचंड मोठी रक्कम द्यावी लागते. 

कोणते प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्स आपल्या बायकोला किती पोटगी देतात, ते पाहा... 

चहलची पत्नी धनश्रीशी घटस्फोट झाल्यानंतर चहलने पोटगी म्हणून करोडोंची रक्कम देण्याची तयारी दाखवली होती. 

शिखर धवनने पत्नी आयशा मुखर्जीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर न्यायालयाने धवनला दरमहा १ लाख रुपयांची पोटगी मुलाच्या संगोपनासाठी देण्याचे आदेश दिले.

ऋतिक रोशन आणि सुझान खानच्या घटस्फोटानंतर ऋतिकने पोटगी म्हणून तब्बल २५ कोटी रुपयांची रक्कम दिली होती. हा बॉलिवूडमधील सर्वात महागडा घटस्फोट मानला जातो.

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने पहिल्या पत्नी रीना दत्ताशी घटस्फोट घेताना तब्बल ५० कोटी रुपयांची पोटगी दिली होती. 

 सैफ अली खानने पहिली पत्नी अमृता सिंगसोबत घटस्फोट घेतल्यावर ५ कोटी रुपयांहून अधिक पोटगी दिली होती. 

संजय दत्तने दुसरी पत्नी रिया पिल्लईसोबत घटस्फोट घेताना सुमारे ८ कोटी रुपयांची पोटगी दिली होती.

करिश्मा कपूरला मुलांच्या संगोपनासाठी दरमहा १० लाख रुपयांची पोटगी मिळते. 

अरबाजने मलायकाला १० ते १५ कोटी रुपये पोटगी दिली होती, मात्र दोघांनी अधिकृतपणे रक्कम जाहीर केलेली नाही.

 फरहान अख्तरने घटस्फोटानंतर अधुनाला मुंबईतील प्राइम लोकेशनवर असलेलं घर आणि आर्थिक पोटगी दिल्याची माहिती आहे.

Click Here