हिरोची 59,490 ईव्ही स्कूटर आली, स्वस्त आहे की महाग...

तगड्या कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक स्कूटर आली... पहा...

हिरो कंपनीमध्ये दोन भाग झाल्याने मुळ हिरो कंपनी आपल्या नावाने ईलेक्ट्रीक स्कूटर विकू शकत नाहीय.

यामुळे हिरोने आपला विडा नावाचा ब्रँड आणला आहे. याची आता सर्वात स्वस्त स्कुटर बाजारात आली आहे. 

Hero MotoCorp ने Vida VX2 ही स्कूटर अवघ्या ५९ हजार रुपयांत आणली आहे. 

हिरोची ही स्कूटर काहीशी एथरच्या रिझ्टा स्कूटर प्रमाणेच दिसत आहे. परंतू, याची वैशिष्ट्ये वेगळी आहेत. 

स्कूटरला एक टीएफटी डिजिटल डिस्प्ले देण्यात आला आहे. यावर वेग आणि बॅटरी चार्ज सारखे आकडे दिसतात. 

ही स्कूटर दोन व्हेरिअंटमध्ये आहे, VX2 Go आणि VX2 Plus. यापैकी गोमध्ये 2.2 kWh ची रिमुव्हेबल बॅटरी देण्यात आली आहे. 

VX2 Plus व्हेरिएंटमध्ये दोन रिमूव्हेबल बॅटरी आहेत, ज्यांची एकूण क्षमता 3.4 kWh आहे.

रेंज 142 किलोमीटरपर्यंत आणि ताशी स्पीड  80 किलोमीटर देऊ शकते. तसेच  1 तासात 0 ते 80 टक्के चार्ज करता येते. 

जर तुम्ही बास सबस्क्रप्शन घेतले तर तुम्हाला VX2 Go ही केवळ 59,490 रुपयांना मिळणार आहे. तर VX2 Plus 64,990 रुपयांना. 

परंतू जर तुम्ही बॅटरी सबस्क्रिप्शन न घेता बॅटरीसह विकत घेतली तर VX2 Go ची किंमत 99,490 आणि VX2 Plus ची 1.10 लाख रुपये किंमत जाणार आहे.

बास म्हणजेच बॅटरी सबस्क्रीप्शन जे एक किमीला तुम्हाला ९६ पैसे एवढे द्यावे लागणार आहे. चार्जिंग तुमच्याकडे असल्याने त्याचा खर्च तुमचा आहे. 

स्कूटर आणि बॅटरीवर पाच वर्षांची वॉरंटी दिली जाणार आहे. वर्षाला १०००० किमी चालविली तर तुम्हाला भाडे म्हणून ९६०० रुपये द्यावे लागणार आहेत. 

Click Here