उन्हाळ्यात पुदीना खाण्याचे 'हे' आहेत अद्भूत फायदे...
तुम्हाला माहीत असायलाच हवेत...
पुदीना ही थंड गुणधर्म असलेली एक औषधी वनस्पती आहे. याचा वापर चटणी, शीतपेये आणि सॅलडमध्ये प्रामुख्याने केला जातो. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा आणि ताजेपणा देण्यासाठी पुदीना अत्यंत गुणकारी ठरतो.
पुदीना पचनसंस्था मजबूत करतो आणि गॅस, अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम देतो. याच्या सेवनाने पोट हलके राहते आणि अन्न लवकर पचण्यास मदत होते.
उन्हाळ्यात पुदीना खाल्ल्याने शरीर आतून थंड राहते आणि उष्णतेचा प्रभाव कमी होतो. यामुळे शरीराला आराम मिळतो.
पुदीन्यामध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यामुळे संसर्गापासूनही बचाव होऊ शकतो. हंगामी आजारांशी लढण्याची ताकद मिळते.
तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी पुदीना अत्यंत प्रभावी आहे. याच्या सेवनाने श्वासांमध्ये ताजेपणा टिकून राहतो आणि तोंडाशी संबंधित समस्या कमी होतात.
पुदीना त्वचेसाठीदेखील उत्तम मानला जातो. पिंपल्स आणि त्वचेची जळजळ कमी करतो. त्वचेला थंडावा देऊन ती टवटवीत आणि चमकदार ठेवण्यास मदत करते.
लिंबू आणि मधाच्या पाण्याने खरंच वजन कमी होतं? जाणून घ्या...