हेळवी समाजाकडे ७००-८०० वर्षांच्या वंशावळीच्या नोंदी असतात
हेळवी समाजाकडे आपल्या वंशावळीची नोंदी असतात.
हेळवी समाज हा मूळचा बेळगाव जिल्ह्यातील. सध्या चिकोडी, अथनी, कागवड या परिसरात हा समाज राहतोय.
या समाजाकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि बेळगाव या जिल्ह्यातील गावागावांच्या वंशावळीचे रेकॉर्ड आहे.
हेळवी लोकांना कन्नड आणि मराठी या दोन्ही भाषा यांना येतात. हेळव्याच्या वंशवळीच्या सगळ्या नोंदी या मोडी लिपीत असतात.
गावातील लोकांची वंशावळ सांगणे, कुळाचा इतिहास सांगणे आणि नवनवीन नोंदणी ठेवणे हे हेळव्यांचं पारंपरिक काम आहे. ते आजही करतात.
हेळवी समाजाचा मूळ पुरुष लंगडा असल्यामुळे तो नंदीबैलावरून फिरायचा. नंतरच्या काळात नंदीबैलाची जागा बैलगाडीने घेतली. त्यामुळेच हेळवी लोक वंशावळ सांगताना मांडी घालून बसतात.
प्रत्येक हेळव्याकडे एकाच परिसरातील १० ते १५ गावं असतात. दर दोन-तीन वर्षातून तो या गावांना भेटी देतो. साधारणपणे दिवाळीनंतर हेळवी आपली पोतडी घेऊन घराबाहेर पडतो.
हेळवी आपली वंशावळ सांगताना आपल्या घराचा मूळ पुरुष कोण आणि मूळ गाव कोणतं ते सांगतो. आपले कुलदैवत, गोत्र, जमीन, संपत्ती याची माहिती सांगतात.
पूर्वी हेळवी वंशवळीच्या नोंदी या ताम्रपटावर नोंदवून ठेवायचे. नंतर ताम्रपट बंद होऊन कागदांच्या पोतड्यावर त्यांनी नोंदी करायला सुरू केल्या.