चहापोळी चवीला कितीही रुचकर लागत असली तरी सुद्धा तिचे दुष्परिणामही आहेत.
भारतीय घरांमध्ये चहा-पोळी हा नाश्ता मोठ्या आवडीने केला जातो. परंतु, ही चहापोळी चवीला कितीही रुचकर लागत असली तरी सुद्धा तिचे काही दुष्परिणामही आहेत.
चहात घातलेली साखर आणि पोळीमध्ये कॅलरीजचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे शरीरातील कॅलरीज सुद्धा वाढतात.परिणामी, वजन वाढू शकतं.
चहा आणि पोळी खाल्ल्यामुळे शरीराला कोणतेही पोषकघटक मिळत नाहीत. त्यामुळे चहापोळी खाण्याचा काहीही उपयोग नाही.
जर तुम्हाला रोज चहापोळी खायची सवय असेल तर त्याचा झोपेवरही परिणाम होतो. इतकंच नाही तर हृदयाच्या गतीवरही त्याचा परिणाम होतो.
चहासोबत पोळी खाल्ल्याने शरीरातील प्रथिने शोषून घेण्यास अडथळा येतो.