जाणून घ्या...
डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात, जे फायदेशीर असतात. परंतु अधिक प्रमाणात ते हानिकारकही ठरू शकतात.
अधिक प्रमाणात डार्क चॉकलेट खाल्ल्याने वजन वाढू शकते. कारण त्यात कॅलरीजचे प्रमाण अधिक असते.
अधिक प्रमाणात कॅफिन असल्याने डार्क चॉकलेटमुळे झोपेचा त्रास आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते.
काही लोकांना डार्क चॉकलेटची अॅलर्जीही होऊ शकते. जसे की, खाज येणे अथवा पुरळ येणे.
डार्क चॉकलेटमध्ये ऑक्सॅलेट्स असतात, यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो.
यात असलेली साखर आणि फॅट्स दाताची किड आणि हृदयाचा आजार वाढवू शकतात.
डार्क चॉकलेट अधिक खाण्याचा रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो, विशेषतः उच्च रक्तदाबावर.
गर्भधारणेदरम्यान अधिक प्रमाणात डार्क चॉकलेट खाल्ल्याने गर्भावर परिणाम होऊ शकतो आणि समस्या वाढू शकते
सावधगिरी - संतुलित प्रमाणात डार्क चॉकलेट खा आणि आरोग्य फायदे मिळवा...