हिरवा निसर्ग हा भोवतीने, पर्यटकांना खुणावतोय 'राऊतवाडी धबधबा'
कोल्हापूरात पावसाने या वर्षी दमदार हजेरी लावली आहे.
पर्यटनाचं केंद्रबिंदू असणारा राऊतवाडी धबधबा प्रवाही झाला आहे.
पश्चिम घाटमाथ्यावरती जोरदार पाऊस पडत आहे. परिणामी पावसाळी पर्यटनाचा आकर्षण असणारा कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा चांगलाच वाहू लागलाय.
राऊतवाडी धबधब्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून व्हिडिओही यामुळे आता पर्यटकही गर्दी करताना दिसून येत आहेत.
जिल्ह्याच्या पर्यटन नकाशात अग्रस्थानी असलेल्या राधानगरी-दाजीपूर परिसरात कोसळणार्या सर्वाधिक पावसामुळे हा निसर्गसंपन्न धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांच्या पसंतीस पडला आहे.
गर्द हिरवाई, घनदाट अभयारण्य, हुडहुडी भरवणारी बोचरी थंडी आणि त्यातच कोसळणारा मुसळधार पाऊस, दाट धुक्यातून वाट शोधत जाणारे घाट पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी होत असते.
या ठिकाणी गवे सुद्धा पाहायला मिळतात. कोल्हापूर शहरापासून 55 ते 60 किलोमीटर अंतरावर हा राऊतवाडी धबधबा असून कोल्हापूरहून - वाडीपीर-हळदी-राशिवडे-कसबा तारळे-सावरधाण-राऊतवाडी अशा मार्गाने येथे जाता येते.
पाऊसाचा जोर वाढल्यानंतर किंवा धबधब्याचं पाणी वाढल्यानंतर प्रशासना व पोलिसांकडून सुरक्षेचा उपाय म्हणून धबधबा पर्यटकांसाठी बंदही केला जातो.