पाऊस, पूर, भूकंपातून वाचेल तुमचा जीव; सुरु ठेवा हे अॅप
भूकंप, पावसाचे अलर्ट देईल हे सरकारी अॅप
गंगोत्री धामजवळील धराली येथे जे घडले ते भयानक होते. खीर गंगा नदीवर ढगफुटी झाल्यानंतर आलेल्या मोठ्या पुरामुळे संपूर्ण परिसर ढिगाऱ्यात बदलला असून अनेक लोक बेपत्ता आहेत.
जर तुम्ही या भागांना भेट देण्याचा विचार करत असाल, तर यापासून वाचण्यासाठी सतर्क राहावे लागेल. ढगफुटीआधी हवामान खूप लवकर बदलते. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.
तुम्हाला अशा ठिकाणी सुरक्षित राहायचे असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये 'SACHET App' डाउनलोड करावे लागेल, जे तुमच्यासाठी सुरक्षा कवच म्हणून काम करेल.
'सचेत अॅप' हे एक सरकारी अॅप आहे. ते गुगल प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. हे भारत सरकारच्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स ने विकसित केले आहे,
याचे काम युजर्संना संभाव्य आपत्ती परिस्थितीबद्दल सतर्क करणे आहे. या अॅपच्या मदतीने, संभाव्य अतिवृष्टी, चक्रीवादळ किंवा भूकंपासारख्या आपत्तींबद्दल अलर्ट पाठवले जातात.
ज्या ठिकाणी आपत्ती आली आहे त्या ठिकाणी काय करावे आणि काय करू नये याची माहिती देखील अॅपमध्ये दिली आहे.
हे अॅप युजर्संना पाऊस, पूर, भूकंप यासारख्या आपत्तींबद्दल रिअल टाइममध्ये नोटिफिकेशन अलर्ट देते. हे अॅप हिंदीसह अनेक प्रादेशिक भाषांमध्ये अलर्ट पाठवते.
जर तुम्ही आपत्तीग्रस्त भागात असाल, तर हे अॅप तुम्हाला फक्त अलर्ट करणार नाही तर जवळच्या मदत छावण्या आणि सुरक्षित मार्गांबद्दल माहिती देखील शेअर करेल.