फोनमध्ये एवढी जीबी रॅम आणि स्टोरेज असेल तरच...; गुगलने वाढविले लिमिट
भविष्यातील फोन घेताना काळजी घ्यावी लागणार आहेच, पण आताच्या फोनचे काय...
गुगलने अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी किमान स्पेसिफिकेशन वाढवले आहेत. हे स्पेसिफिकेशन अँड्रॉइड आणि गुगल मोबाईल सेवांसाठी आवश्यक असतात.
गुगलने रॅम आणि स्टोरेजची किमान मर्यादा वाढवली आहे. ही मर्यादा एन्ट्री लेव्हल स्मार्टफोनसाठी आवश्यक आहे.
मध्यम श्रेणी आणि प्रीमियम श्रेणीच्या स्मार्टफोनमध्ये अधिक रॅम आणि स्टोरेजचा पर्याय असतो. खरी समस्या एन्ट्री-लेव्हल फोनला येणार आहे.
अँड्रॉइड ऑथॉरिटीने अपडेटेड स्पेसिफिकेशन दिले आहेत. अँड्रॉइड १५ असलेल्या स्मार्टफोनना किमान ३२ जीबी स्टोरेजची आवश्यकता असेल.
अँड्रॉइड १३ लाँच झाल्यानंतर, गुगलने किमान स्टोरेज ८ जीबीवरून १६ जीबीपर्यंत वाढवले. आता त्यात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे.
स्मार्टफोन निर्मात्यांना वापरकर्त्यासाठी ७५ टक्के इन-बिल्ट स्टोरेज स्पेस सोडावी लागेल, असेही बंधन गुगलने घातले आहे. बहुतेक फोन किमान ६४ जीबी स्टोरेजसह येतात.
किमान रॅम ४ जीबी पर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा अर्थ असा की आता एका एंट्री लेव्हल स्मार्टफोनमध्ये किमान ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असायला हवे.
जर यापेक्षा कमी रॅम किंवा स्टोरेज उपलब्ध असेल तर तो फोन अँड्रॉइड गो एडिशनवर काम करणार आहे.
तसेच अँड्रॉइड १६ सह पुढील अपडेट या केवळ किमान ६ जीबी रॅमच्या पुढील फोनवरच चालू शकणार आहे.
यामुळे भविष्यातील फोन घेताना किमान ६ जीबी, ८ जीबी किंवा १२ जीबी मेमरी असलेला घ्या, म्हणजे पुढील काही वर्षे तो अपडेट होत राहिल.