गुगल मॅपने रस्ता चुकीचा दाखवला? डेटा सेव्ह करताना ही चूक करू नका

आपण कुठेही प्रवास करताना गुगल मॅपचा वापर करतो.

अँड्रॉइड ऑटो अंतर्गत, एक ब्लू बाण वापरकर्त्यांना मार्ग दाखवतो. त्यांना त्यांच्या गंतव्यस्थानावर नेण्याचा दावा करतो. पण यामुळे काही अपघात झाले आहेत. गुगल मॅप्समध्ये या समस्या का येतात ते जाणून घेऊया.

बरेच लोक नेव्हिगेशनसाठी गुगल मॅप्स वापरतात. अँड्रॉइड ऑटो ही त्याचे एक व्हर्जन आहे, हे कारमध्ये सुरू केले जाते.

शुक्रवारी रात्री उशिरा नवी मुंबईतील बेलापूरमध्ये मॅपमुळेच अपघात झाला असता थोडक्यात अपघात टळला. 

गुगल मॅप्सच्या निर्देशांचे पालन करणाऱ्या एका महिलेची कार थेट खाडीत कोसळली. अपघाताच्या वेळी पाण्याचा प्रवाह जास्त होता. 

अपघातस्थळी सागरी सुरक्षा पोलिसांनी वेळीच महिलेला वाचवले आणि तिचा जीव वाचवला.

गुगल मॅप्सद्वारे चुकीच्या नेव्हिगेशनमुळे होणारा हा पहिला अपघात नाही. याआधीही अनेक अपघात झाले आहेत. ९ जून २०२५ रोजी उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातही एक अपघात झाला होता.

आता प्रश्न असा उद्भवतो की गुगल मॅप्सवर या चुका का होतात आणि त्या कोणासोबत होतात. या चुकांमागील कारण जाणून घेऊया.

नवीन रस्ते बांधल्यानंतर काही ठिकाणी जुने रस्ते बंद होतात. अशा परिस्थितीत, जर नवीन रस्त्याचा डेटा अपडेट केला नाही तर अशा समस्या उद्भवतात.

अनेकदा, दाट लोकवस्ती असलेल्या भागात, अनेक इमारती, बोगदे आणि जंगलांमध्ये आणि कधीकधी खराब हवामानात GPS सिग्नल कमकुवत होतात. अशा परिस्थितीत, ते कधीकधी चुकीची दिशा दाखवते.

ग्रामीण भागातील जुन्या रस्त्यांबाबतही गुगल मॅप्स कधीकधी चुकीची माहिती देते. म्हणूनच ग्रामीण भागात असे अपघात होतात.

बऱ्याच वेळा वापरकर्ते डेटा सेव्ह करण्यासाठी त्यांचे गुगल मॅप्स अपडेट करत नाहीत. पण तुम्ही ही चूक करु नका, मॅप्स अपडेट करा.

Click Here