तिकडे युद्धविराम अन् इकडे सोन्याचे दर धडाम

गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम शेअर बाजारासोबतच सोने-चांदीवरही स्पष्ट दिसत होता.

युद्धाच्या भीतीने सोन्याचे दर सतत वाढत होते, कारण गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याला प्राधान्य देत होते.

पण आता एक मोठी दिलासादायक बातमी! इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी (Ceasefire) झाली आहे.

या युद्धबंदीमुळे जागतिक बाजारातील तणाव कमी झाला आहे, आणि याचा थेट परिणाम सोन्याच्या दरांवर दिसून येत आहे.

मंगळवारी (२४ जून २०२५) सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली आहे.

आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९७,२८८ रुपये आहे, जो कालच्या ९८,८८४ रुपयांपेक्षा कमी आहे.

सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. आज चांदीचा दर १०५,८९८ रुपये प्रति किलो आहे.

काल चांदीचा दर १०६,८०० रुपये प्रति किलो होता, म्हणजेच एका दिवसात जवळपास ९०० रुपयांची घट झाली आहे.

महागाईपासून संरक्षण करणारी ही सुरक्षित गुंतवणूक आता स्वस्त झाली आहे. सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे!

Click Here