गोकर्णाच्या फुलांमध्ये असतात ‘हे’ औषधी गुणधर्म
गोकर्ण ही भारतीय वंशाची वेलवर्गीय सदाहरित वनस्पती आहे.
फुलांचा आकार गायीच्या कानासारखा असतो म्हणून याला ‘गोकर्ण’ हे नाव पडले असावे.
या फुलांचा रंग गडद निळा असतो. तसेच फिकट निळा, फिकट गुलाबी, सफेद या रंगांची फुले असलेली गोकर्णदेखील आढळते.
या फुलांचे असंख्य औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळेच अनेक रोग, व्याधी निवारण्यासाठी या फुलांचा वापर केला जातो.
निळ्या गोकर्णाच्या फुलांपासून नैसर्गिक रंगदेखील तयार केला जातो.
गोकर्ण या फुलामुळे रक्तशुद्धीकरणसुद्धा होते.