साप पकडणाऱ्या 'देशी गर्ल'चा हटके लूक सोशल मीडियात व्हायरल

सध्या सोशल मीडियात एका मॉर्डन देशी मुलीचा साप पकडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

साप एक असा जीव आहे, ज्याला पाहिल्यानंतर कुणालाही घाम फुटेल. सापाला पाहताच प्रत्येकजण जीव वाचवण्यासाठी पळतो. 

मात्र काही सर्पमित्र असतात, जे जीव धोक्यात घालून सापाला पकडतात आणि त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडून देतात. 

अशाच एका मॉर्डन देशी मुलाचा व्हिडिओ समोर आला आहे. जी हटके स्टाईलने थेट सापाजवळ जात त्याला सहज हातात घेते. 

एका बांधकाम सुरू असणाऱ्या घराजवळ हा साप कोपऱ्यात बसलेला असतो, ही मुलगी त्या सापाला पकडते आणि शेतात सोडून देते 

या साप पकडणाऱ्या मुलीचं सौंदर्य पाहून अनेकजणांना तिने केलेल्या धाडसी कृत्याचे आश्चर्य वाटते. ही एक मॉडेलसारखी दिसते. 

तिचा व्हायरल व्हिडिओ अनेकांना पसंत पडला आहे. तो वेगाने व्हायरल केला जात आहे. अनेकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले आहे.

या मुलीचे नाव साइबा असे आहे. ती सर्पमित्र असून सापांना पकडून ती नैसर्गिक अधिवासात सोडून देत असते. तिचे अनेक फोटो, व्हिडिओ पाहायला मिळतात. 

Click Here