तुझी-माझी जोडी जमली...

गौतमी-स्वानंदचे खास क्षण, पाहा फोटो

गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर हे मराठी मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय जोडपे आहे. 

स्वानंद व गौतमी दोघेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. निरनिराळे फोटो, व्हिडीओ पोस्ट करीत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. 

आज स्वानंदचा वाढदिवस आहे.  या खास प्रसंगी गौतमीनं खास पोस्ट शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

तिनं लिहलं, "माझ्या प्रियाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... माझा आधार, माझा आधारस्तंभ. सूर्यनंतर, तू पर्यायी उर्जा स्रोत आहेस. असाच 'वेडा मुलगा' रहा! माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे".

स्वानंद व गौतमी अनेकदा पोस्टच्या माध्यमातून एकमेकांवरील प्रेम जाहीर करत आहेत.

गौतमी आणि स्वानंद यांचं लव्ह मॅरेज आहे. विशेष म्हणजे गौतमीने स्वानंदला नकार दिला होता. परंतु, त्याच्यासोबत मैत्री झाल्यानंतर ती सुद्धा त्याच्या प्रेमात पडली. 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, 'माझा होशील ना' या मालिकेमुळे गौतमीला विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत गौतमीनं सई ही भूमिका साकारली. 

तर स्वानंद तेंडुलकर मराठीतील पहिलं डिजीटल चॅनल 'भाडिपा'चा बिझनेस हेड आहे. तसेच  भाडिपाच्या विविध व्हिडीओ आणि सीरिजमध्येही तो अभिनयही करताना दिसला आहे. 

Click Here