मूर्ती लहान पण..; अवघ्या ३ फूटाचा जगातील सर्वात लहान डॉक्टर

लोकांचे टोमणे, अनेक अडचणींवर मात करून या युवकाने गाठलं यशाचं शिखर

जगात असे अनेक लोक आहेत, जे संघर्षातून यश मिळवून इतिहास रचतात. अशीच एक कहाणी आहे २३ वर्षीय डॉक्टर गणेश बरैया यांची

गुजरातच्या तलाजा थालुका इथं जन्मलेला गणेश उंचीने अवघा ३ फूट आहे परंतु त्याने मिळवलेल्या यशाने तो जगातील सर्वात लहान डॉक्टर म्हणून ओळखला जातो. 

वयाच्या चौथ्या वर्षी गणेशचे डोके शरीरापेक्षा मोठे होत असल्याचे आई वडिलांच्या निदर्शनास आले. डॉक्टरांनी हा एक आजार असल्याचे सांगितले

उंचीने लहान असल्याने शाळेपासून अनेक ठिकाणी गणेशची कायम चेष्टा करण्यात आली. त्याचे वडील शेतकरी होते, दिवसाला २०० रुपये मजुरीवर कमवायचे

लहानपणापासून गणेशला डॉक्टर बनण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने मेडिकल परीक्षा देत MBBS शिक्षणासाठी प्रवेश मिळवला परंतु त्याचा संघर्ष इथे संपला नाही

मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने गणेशच्या उंचीमुळे त्याचा अर्ज फेटाळला. परंतु गणेशने हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत त्याविरोधात लढा दिला.

२०१८ साली सुप्रीम कोर्टाने गणेशच्या बाजूने निकाल देत त्याला दिलासा दिला. आज गणेश बरैया जगातील सर्वात छोटा डॉक्टर म्हणून प्रसिद्ध झाला आहे

Click Here