नव्या GST नुसार किती स्वस्त होणार Bike ? खरेदीदारांना मोठा दिलासा

दिवाळीपूर्वी सर्वसामान्यांना दिलासा देण्याची केंद्र सरकार तयारी करत आहे

दुचाकी वाहनावरील जीएसटी कर लवकरच कमी होऊ शकतो, सध्या पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकींवर २८% जीएसटी आकारला जातो

३५० सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या बाईकवर अतिरिक्त ३% सेस आकारला जातो, ज्यामुळे एकूण कर ३१% होतो.

सरकार जीएसटी २.० फ्रेमवर्क अंतर्गत दुचाकी वाहनांना थेट १८% जीएसटी स्लॅबमध्ये समाविष्ट करण्याची योजना आखत आहे

या प्रस्तावावर अंतिम निर्णय ३ आणि ४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत घेतला जाऊ शकतो

जर जीएसटी १८% पर्यंत कमी केला तर दुचाकींच्या किमतीत मोठी घट होईल, त्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो.

जर बाईकची किंमत सुमारे १ लाख रुपये असेल तर ग्राहकांची ८ ते १० हजार रुपयांची बचत होऊ शकते

किमती कमी केल्याने दुचाकी विक्रीत वाढ होईल, उत्पादन वाढेल आणि ऑटो क्षेत्रात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील

Click Here